सकारत्मकता व इच्छाशक्ती असेल तरच जीवनात यशस्वी व्हाल - मा.प्रा. दुनाखे सर

0
          श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपुर (ता. इंदापूर) (प्रतिनिधी) - येथील चैतन्य विद्यालय व श्री.सु.गो.दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात इ.10 वी व इ.12 वी  विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य, प्रशाला समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय दुनाखेसर यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत,.. कष्ट,.. आत्मविश्वास,.. वेळेचे महत्व,.. सकारत्मकता,.. इच्छा शक्ती असेल तरच जीवनात यश मिळते हे विचार मांडले...
            याप्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री. मगनदास क्षीरसागर प्रमुख अतिथी म्हणून होते.. विद्यार्थी वक्त्यांनी सुंदर विचार मांडले व भविष्षात गुरूजनांनी दिलेले मार्गदर्शन हाच यशस्वी होण्यांचा मंत्र या विचारावरच वाटचाल करू हे सांगितले.. विद्यार्थी वक्त्यामध्ये कु. प्रांजली रामचंद्र पराडे हिने प्रभावी विचार मांडले. कविता कोणावर करावी तर ती चैतन्य विद्यालयातील गुरूजनांवर करावी. तिने सुंदर कवीता सादर केली..सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांची गुण वैशिष्टे स्वभाव यांचेही कांही विद्यार्थ्यींनी मनोगतातून विचार मांडले.. कु.समृध्दी नवनाथ पराडे,.. कु.सानिका नेताजी सरवदे,.. कु.धनश्री गणेश पराडे.. व सुदर्शन दळवी या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली...
             शिक्षक वक्ते श्री.हनुमंत पराडे सर यांनी प्रेरणादायी विचार मांडले यशस्वी नेते, विचारवंत,. शास्रज्ञ,..ए.पी.जे अब्दुल कलाम  माजी राष्ट्रपती,..डाँ.बाबासाहेब आंबेडकर,..बराक ओबामा..सचिन तेंडुलकर,..लता मंगेशकर ..विवेकानंद... यांचे विचार मांडले..
           विद्यार्थ्यांनी शाळेस पंखे भेट दिले. भविष्यकाळातही शाळा आपली आहे म्हणून वारंवार यावे असे आवाहन केले. प्रेरणादायी  बोधकथा प्राचार्य श्री. गोरख लोखंडे सर यांनी सांगीतले.! इ.10 वीचे वर्गशिक्षक श्री. कुंभारसर,..श्री.तोडकर सर, इ.12 वीचे वर्गशिक्षक श्री.मिटकलसर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन श्री.कुंभार सर यांनी केले. अध्यक्षीय निवड श्री.तोडकर सर यांनी केली व आभार श्री.खटके सर यांनी मानले..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)