पंढरपूर (प्रतिनिधी) - राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर जिल्ह्यात प्रवासी राजा दिन या उपक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा, सुविधा यामधील अडचणी, समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घेऊन तातडीने निवारण करण्यात यावे असे आदेश राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक आगारामध्ये याचे आयोजन केले जाणार असून महामंडळाचे जिल्हा स्तरावरील अधिकारी व आगार प्रमुख उपस्थित राहून तक्रारींचे निराकरण करणार आहेत.
बार्शी-सोमवार २८ ऑक्टोबर
अक्कलकोट-सोमवार ४ नोव्हेंबर
करमाळा-शुक्रवार ८ नोव्हेंबर
अकलूज-सोमवार ११ नोव्हेंबर
सांगोला-सोमवार १८ नोव्हेंबर
कुर्डुवाडी-शुक्रवार २२ नोव्हेंबर
मंगळवेढा-सोमवार २५ नोव्हेंबर.
तरी प्रवाशांनी, प्रवासी संघटनांनी दु. १२ ते २यावेळेत उपस्थित राहून समस्या, अडचणींचे निराकरण करुन घ्यावे असे आवाहन सोलापूरचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा महिला विभाग प्रमुख सौ. माधुरी परदेशी, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, सचिव प्रा.धनंजय पंधे, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर, संतोष उपाध्ये यांनी केले आहे.