प्रशांतराव परिचारक यांनी केले मंदिर परिसरातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

0
         पंढरपूर (प्रतिनिधी)  - आषाढी यात्रा तोंडावर येऊन ठेपली आहे. यावर्षी प्रशासनाने आषाढी यात्रेसाठी बारा ते पंधरा लाख भाविक येण्याचा अंदाज वर्तवला आहे. पंढरी नगरीत आषाढी वारी पूर्व नियोजनाच्या धर्तीवर मंदिर परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी मा. प्रशांत मालक परिचारक यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकनेते प्रणव परिचारक आणि श्री. नरेंद्र डांगे यांनी श्रीनामदेव पायरी, हरिदास वेस परिसर तसेच मुक्ताबाई मठ परिसरातील ड्रेनेज समस्या, स्वछता इ. कामे न. पा. उपमुख्याधिकारी श्री. वाळूजकर साहेब, आरोग्याधिकारी वाघमारे साहेब, यांच्या सहकार्याने आज तातडीने मार्गी लावल्या.
         त्यावेळी  परिसरातील नागरिक श्री. मुकुंदमहाराज बडवे, श्री. भट्टड, श्री. दीपक तुळजापूरकर तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
        मा. प्रशांत मालक परिचारक यांच्या  या कार्यतत्परतेमुळे मंदिर परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)