गरजूंना मदतीचा हात देणारा सांगोला लायन्स क्लब- ला.वासुदेव कलघटगी
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला लायन्स क्लबचे मार्गदर्शक माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या आचार विचारापाठीमागे समाजाचा अभ्युदय असल्याने लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून आजवर व लायन वर्ष २०२३-२४ मध्ये समाजाच्या हिताचे झालेले मौलिक कार्य गरजूंना मदतीचा हात देणारे आहे असे प्रतिपादन माजी प्रांतपाल ला.वासुदेव कलघटगी यांनी केले. सांगोला विद्यामंदिर, सांगोला येथे लायन्स क्लब ऑफ सांगोला ला. वर्ष २०२४-२५ नूतन पदाधिकारी शपथविधी व पदग्रहण समारंभ प्रसंगी पदप्रधान अधिकारी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नूतन सदस्य शपथप्रदान अधिकारी, माजी प्रांतपाल ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, रिजन चेअरमन ला.राहुल दोशी, झोन चेअरमन ला.विवेक परदेशी, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर उपस्थित होते.
सुरूवातीला नूतन सदस्य पदप्रधान अधिकारी क्लबचे मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, उपविभाग, विभाग, प्रांत, बहूप्रांत यानुसार जागतिक स्तरावर लायन्स क्लबचे अमोघ कार्य सांगत नूतन सदस्य प्राचार्य अमोल गायकवाड, प्रशांत लवटे, महेश कदम, गणेश पैलवान, कुंडलिक आलदर यांना शपथ दिली. व गोष्टीच्या माध्यमातून सकारात्मकता सांगितली.
पुढे बोलताना ला.कलघटगी यांनी सांगोला लायन्स क्लब कडून घेण्यात आलेली नेत्र शिबिरे त्यातून झालेल्या शस्त्रक्रिया, मार्गदर्शक प्रा.झपके सर यांच्या वाढदिवसानिमित्त हजारापेक्षा जास्त संख्येने होणारे रक्तदान शिबिर व क्लब कडून विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा उल्लेखनीय कार्यासाठी वेळोवेळी झालेला गौरव याचा उल्लेख करत ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांचे कौतुक केले. त्यानंतर ला.वर्ष २०२४-२५ नूतन अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव व संचालक मंडळास पदाचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव आपल्या विवेचनातून करून दिली व पदग्रहणाची शपथ दिली.
यावेळी रिजन चेअरमन ला.राहुल दोशी, झोन चेअरमन ला.विवेक परदेशी यांनी प्रांताच्या नियोजनानुसार राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमासाठी आवश्यक सहकार्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगत नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
नूतन अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले- प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला खूप चांगले कार्य करत आहे, या क्लबच्या अध्यक्षपदाचा पदभार घेताना मला मनस्वी आनंद होतो आहे असे सांगत आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब संघटना आणि त्यांचे कार्य नेहमी आपणास वेगळी अनुभूती देणारे आहे.यापुढे हे कार्य सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी कॅबिनेट ऑफिसर सीए ला.उत्तम बनकर, ला.गिरीश नष्टे, ला.प्रा.धनाजी चव्हाण तसेच संचालक ला.संजीव शिंदे, ला. सुहास होनराव, ला.शीला झपके, ला. विलास क्षिरसागर, ला.प्रा.अमर गुळमिरे, ला.अमर लोखंडे, ला. डॉ .शैलेश डोंबे, यांच्यासह ला.दिपक मोहोळकर, ला.कैलाश कारंडे, ला.सतीश निपाणकर, ला.हेमल दोशी, डॉ.जीवनमुक्ती डोंबे, प्रा.अपर्णा आटपाडीकर, सांगोला लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली ला.अमोल महिमकर यांनी वाचन केले. ला.उन्मेष आटपाडीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ला.प्रशांत रायचुरे यांनी सचिवांचा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन ला.सुनील भोरे यांनी केले तर आभार ला.बाळराजे सावंत यांनी मानले.