शासकीयस्तरावर संत नामदेव समाधी सोहळा साजरा करु : मुख्यमंत्री
मुंबई दि. २५ (वृत्तसंस्था) - श्रीसंत नामदेव महाराजांनी शांती, समता व बंधुता हा विचार जोपासत महाराष्ट्रासह उत्तर भारतात भागवत धर्म प्रचार व प्रसाराचे मोठे कार्य केले आहे. हे कार्य पुढे नेण्यासाठी राज्य शासन भरघोस निधीची तरतुद करेल तसेच शासकीयस्तरावर संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा साजरा करु असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.