पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

0


        अहमदाबाद (वृत्तसंस्था) -   देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जागा आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

       रानिप हा भाग गांधीनगर लोकसभा मतदार संघात येतो, येथून भारतीय जनता पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे.

       मतदानानंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडा, असं आवाहन मोदींनी जनतेला केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनाही प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘या उन्हात तुम्ही लोक रात्रंदिवस फेऱ्या मारत आहात. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी करावी. माध्यमांमध्ये सध्या बरीच स्पर्धा आहे. इकडे-तिकडे आधी धावावे लागते’ असे सांगत त्यांनी माध्यमकर्मींना उन्हात सांभाळून राहण्याचा आणि जास्तीत पाणी पिण्याचा सल्ला दिला.

--------------------------------------------------

जास्तीत जास्त लोकांना मतदानाचे आवाहन

           आज मतदानाचा तिसरा टप्पा आहे, मी देशवासियांना आवाहन करेन की, लोकशाहीत मतदान हे साधे दान नाही, आपल्या देशात दानाला महत्त्व आहे. देशवासीयांनी जास्तीत जास्त मतदान करावे.

--------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)