पुणे (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ.सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ सोलापूरवासियांचा मेळावा पुणे येथिल नवले लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, संतोष भाऊ पवार, सुरेश पालवे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षाताई शिंदे, रमेश बापू कोंडे, विकास दांगट, युवराज बेलदरे, संतोष फरांदे, सनी मानकर, राहुल पोकळे, शैलेश चरवड, डॉ.सुधाकर जाधवर सर, जुबेर बागवान, अकुरशेठ कुदळे, पैलवान आप्पा आखाडे, बाबा पाटील, सुनील काळे, माधवराव डोईफोडे, बाळासाहेब नवले, सुनिता डांगे, पूजा झोळे, सोनाली गाडे, सपना राऊत, माधवी मोरे, व पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या सोलापूरकर बांधवांशी संवाद साधत सोलापूरवासियांच्या समस्या जाणून घेत येणार्या काळात त्या ताकदीने सोडवण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सोलापूरकरांसाठी आम्ही सोलापूर विकास मंच ची स्थापन ही करण्यात आली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत विजय खेचून आणावा, असे आवाहनही दादांनी यावेळी केले.
या मेळाव्याचे संयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे व पुणे शहर उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले होते.