खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर मोठें शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल करणार
Author -
PANDHARI SANDESH NEWS
April 15, 2024
0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
सातारा (प्रतिनिधी) - माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 16 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे भरणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातून गत वेळेस भाजपाच्या तिकिटावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडून आले होते. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा भाजपाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली असून महाराष्ट्रातील भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव होते.
माढा लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 16 रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मोठे शक्ती प्रदर्शन करीत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भरणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व इतर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.