प्रजासत्ताक दिनी शहीद जवान मेजर कुणालगिर गोसावी व शहीद जवान हवालदार हनुमंत करडे यांच्या वीर माता व वीर पत्नींचा सन्मान
नीरानरसिंहपूर ता. इंदापूर (प्रतिनिधी) - येथील चैतन्य विद्यालय व श्री सु.गो. दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन शहीद जवान मेजर कुणालगिर गोसावी पंढरपूर व शहीद जवान हवालदार हनुमंत करडे अकलूज यांच्या कुटुंबियांचा सन्मान करून उत्साह साजरा करण्यात आला.
शहीद जवान कुणाल गिरी गोसावी यांच्या वीर माता सौ. वृंदा मुन्नागिरीगिर गोसावी यांचा शिक्षण प्रसारक मंडळ निरानरसिंगपूर यांच्यावतीने कार्यकारणी सदस्य सौ.भाग्यश्री दंडवते,. कार्यवाह श्रीकांत दंडवते ,.खजिनदार मगन शेठ क्षीरसागर,.शि. .प्र.. मंडळ सदस्य श्यामराज दंडवते यांनी सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार व मानधन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शहीद जवान हनुमंत करडे अकलूज यांच्या वीर पत्नी मोनिका हनुमंत करडे व मुलगा तुषार करडे यांचा सन्मान शिक्षण प्रसारक मंडळ व श्रीकृष्ण दंडवते व परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार, व मानधन देऊन करण्यात आला. हा सन्मान शि.प्र.मंडळ कार्यवाह श्रीकांत दंडवते. सौ.भाग्यश्री दंडवते ,श्रीकृष्ण दंडवते, सूर्यनारायण दंडवते, मगन क्षीरसागर, शामराज दंडवते प्राचार्य गोरख लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शहीद जवान कुणालगिर गोसावी व शहीद जवान हनुमंत करडे यांच्या लष्करी कार्याचा व योगदानाचा आढावा श्री धनंजय दुनाखे यांनी घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी उभा राहून शहीद जवान कुणालगिर गोसावी व शहीद जवान हनुमंत करडे.अमर रहे .! अमर रहे .!!..या घोषणा देत मानवंदना अर्पण केली.
या प्रजासत्ताक सोहळ्याचे ध्वजारोहण शहीद जवान मेजर कुणाल गिरी गोसावी यांच्या मातोश्री वीर माता सौ. वृंदा गिरी गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य व शि. प्र. मंडळ सदस्य धनंजय दुनाखे सर होते. या राष्ट्रीय सोहळ्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये प्रणव फुलारे, राज मोहिते, व ओमदत्त मोहिते, सानवी देवळे, प्रांजली पराडे, सिद्धी महाडिक यांनी देश भक्ती व प्रजासत्ताक दिन याविषयी मनोगत व्यक्त केली. तसेच देशभक्तीपर गीतेही सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी शिक्षक, ग्रामस्थ यांना श्री.खटकेसर यांनी संविधान शपथ व बालविवाह प्रतिबंधक शपथ दिली. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांकांना बक्षीस व पारितोषिके देऊन प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामध्ये चित्रकला स्पर्धेत आकाश नेताजी पावसे,. दिव्या भारत पावसे, तसेच रांगोळी स्पर्धेत कुमारी यशवंती मनोज मासुळे, ऋतुजा श्रीकांत लावणी., अश्विनी संतोष पराडे, सानिका अभंगराव ,.राजनंदिनी राजेंद्र इनामदार ,.यांना पारितोषिके देण्यात आली. या सोहळ्यात इयत्ता दहावी मार्च 2021 वर्षातील कोरोना काळातील दहावीत प्रथम क्रमांक येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. प्रथम क्रमांक कु.निकिता भाऊसाहेब रानमाळ गुण 99.6% द्वितीय क्रमांक कु.राजनंदिनी संतोष मिसाळ, 98.6 %तृतीय क्रमांक पल्लवी पांडुरंग सौंदणे 96% या गुणवंत विद्यार्थ्यानींचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला व रोख बक्षीसे देण्यात आली.
या प्रसंगी शहिद जवान मेजर यांच्या मातोश्री वीरमाता यांनी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केले.पालकांनी आपल्या पाल्याला लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे संस्कार द्यावेत.. विद्यार्थ्यांनी भरपूर व्यायाम करून बलदंड होऊन लष्करात जावे खरी देशसेवा करण्याचे भाग्य मिळते.! मोबाईल,. टी.व्ही,. सोशल मिडिया,.फेसबुक,.यावर वेळ वाया घालू नये; भरपुर अभ्यास करावा. देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा.!..हे मौलीक संदेश व विचार मांडले.!..तसेच अध्यक्षीय भाषणात श्री.धनंजय दुनाखे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व व भारत देशाने केलेली प्रगती या विषयी विचार मांडले.! सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी रांगोळी प्रदर्शन पाहीले.
या राष्ट्रीय कार्यक्रम सोहळ्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, मेजर आकाश पांढरे माजी फौजी मॅन, श्रीकृष्ण दंडवते, सूर्यनारायण दंडवते, खंडाळे सर, प्रभाकर जगताप, सुखदेव जाधव व सर्व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य लोखंडे सर व सांस्कृतिक विभाग प्रमुख लावंड सर यांनी चांगले केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंकुश लावंड यांनी केले तर आभार श्री कृष्णा खटके यांनी मानले, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.