परभणी (प्रतिनिधी) - येथील श्री.रामकृष्ण हरी मित्र मंडळ संचलित वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन परभणी, लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रतिवर्षी विविध क्षेत्रातील चौदा पुरस्कार वितरण केले जातात.त्या अनुषंगाने या वर्षाच्या अध्यात्मिक प्रभावती नगरी गौरव पुरस्कार सोहळा दि.१२/०१/२०२४ रोजी संपन्न झाला.
या वर्षाच्या अध्यात्मिक प्रभावती नगरी गौरव पुरस्कारासाठी परभणीचे भुमीपुत्र ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज झाडगांवकर यांची निवड करण्यात आली. भागवताचार्य ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज झाडगांवकर यांनी महाराष्ट्र आणि इतर अनेक राज्यांमध्ये भागवतकथा, श्रीराम कथा, शिवकथा व किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करुन अनेक नवतरुणांना घडवले. या त्यांच्या उज्ज्वल कार्याची दखल घेऊन या वर्षाच्या अध्यात्मिक प्रभावती नगरी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना सत्कारमूर्ती ह भ प पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांनी आपले मनोगतात- हा पुरस्कार स्वीकारताना माझे श्रीगुरु संत मारुती महाराज, माझे आई- वडील व वारकरी संप्रदायातील सर्व माझे सहकारी व मित्र मंडळ या सर्वांच्या आशिर्वादानेच या गौरवाला मी सन्मानपात्र झालो. मला दिलेल्या अध्यात्मिक प्रभावती नगरी गौरव पुरस्काराचा सन्मान योग्य कार्य, सामाजिक, अध्यात्मिक, धार्मिक व देव,धर्म,देश यासाठी योगदान देण्याचा सदैव प्रयत्न करीन हे कार्य सक्रियेतेने करण्यासाठी साधू संत व पांडुरंग परमात्मा यांचा आशिर्वाद सदैव लाभावे अशी प्रार्थना केली.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला परभणी शहारातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी, स्वागताध्यक्ष श्री अक्षय चंद्रकांत डहाळे, प्रमुख आतिथी श्री पवन निकम, प्रमुख पाहुणे श्री शिवलिंग आप्पा खापरे, श्री विमल पांडे, निमंत्रक श्री संजीव आढागळे, मार्गदर्शक श्री नारायणराव चट्टे, कार्यक्रमाचे आयोजक प्रभावती नगरी पुरस्कार निवड समिती अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर बंडेवार, सुरेश देशपांडे, सुरेश धावडकर, जीवन आप्पा तरवडगे, चित्रकार महेश स्वामी, सामाजिक कार्यकर्ते संदीप वायवळ, सुरेखा लखमले रुक्मिणी जाधव, बालकलाकार रुद्राक्ष आवटे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी शेवटे सर यांनी केले.