मोहोळ (प्रतिनिधी) - मोहोळ ग्रामीण रुग्णालय येथे आमदार यशवंत तात्या माने, सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी अचानक भेट देऊन रुग्णांची आरोग्यसेवा बद्दल विचारपूस केली. तसेच कामकाजाची देखील आढावा घेतला. यावेळी रुग्णांच्या सेवेमध्ये हलगर्जीपणा होत असल्याचे आमदार श्री यशवंत (तात्या) माने यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य सेविका, कर्मचाऱ्यांची आमदार साहेब यांनी बैठक बोलावून दैनंदिन कामाचा आढावा घेण्यात आला.
रुग्णांची गैरसोय होत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्याने यापुढे रुग्णसेवेमध्ये हलगर्जीपणा कराल तर कारवाईला सामोरे जाल असा इशारा आमदार यशवंत(तात्या)माने यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपनगराध्यक्ष प्रमेद डोके, शहराध्यक्ष रुपेश धोत्रे, नगरसेवक दत्ता खवळे, संतोष खंदारे, आनंद गावडे, जयवंत गुंड, शकील शेख, गौतम क्षीरसागर, संतोष धोत्रे, नागेश बिराजदार, मुकेश बचुटे,जीवराज गुंड, भैरू कोकाटेसह डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.