सोहळ्यास उद्यापासून प्रारंभ
निरानरसिंहपुर ता. इंदापूर (प्रतिनिधी) - श्रीक्षेत्र निरानरसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात वद्य नवमी व वद्य दशमी या दिवशी श्रीनृसिंह मंदिराचा जीर्णोद्धार व याच दिवशी नृसिंह मूर्तीची सिंहासनावर केलेली प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने लक्ष्मी नरसिंह मंदिरात संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा ज्ञान सोहळा रविवार दिनांक 31 डिसेंबर २०२३ ते शनिवार दि.6 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये होत आहे.
या श्रीमद् भागवत कथेसाठी सांगलीच्या प्रसिद्ध निरूपणकार ह .भ. प. सौ. संध्या संतोष पाठक या भागवत कथा करणार आहेत तसेच सकाळी संहिता वाचन निरानरसिंहपूर येथील वेदमूर्ती सुभाष शास्त्री जपे काका करणार आहेत. या श्रीमद् भागवत कथेच्या कालावधीमध्ये दररोज दुपारी 2 ते 3:30 वा. पर्यत भजन, सुगम भक्तिसंगित, दि.31 डिसेंबर ..पंक्रोशीतील शेवरे,. संगम,. टणू,. गिरवी,. बाभुळगांव,. निरानरसिंहपूर येथील भजनी मंडळे-
दि.1जाने- स्वर संवाद ग्रुप टेंभुर्णी येथील विनायक टल्लू व सहकारी.
दि.2जाने- ब्रम्हचैतन्य महिला भजनी मंडळ माळीनगर सौ.कल्पना देशपांडे मॅडम व सहकारी.. दि.3जाने-माळशिरस महिला भजनी मंडळ. दि.4जाने-जयश्री समाज महिला भजनी मंडळ श्रीपूर सौ. कल्पना क़ुलकर्णी मॅडम व सहकारी. दि.5 जाने-भक्त प्रल्हाद संगीत विद्यालय नीरानरसिंहपूर ह.भ.प.अंकुश रणखांबे महाराज व डाॅ.अरूण महाराज वैद्य व विद्यार्थ्यी..
दि.6 जाने-श्रीमद् भागवत कथा सोहळा समाप्ती.. आदी कार्यक्रम होत आहेत.
दररोज रात्री 8 ते 9:30 या कालावधीमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी या श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीलक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे साहेब, विश्वस्त प्रमोद साहेब दंडवते, विश्वस्त प्रकाश सुरू सर, विश्वस्त अभय वांकर-पाटील यांनी केले आहे.