रहाटी ता.उमरी जि. नांदेड (प्रतिनिधी) - येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र शाखा नामफलकांचे अनावरण व अनेक शाखा कार्यकारिणी निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा होणार आहे. भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन ऊमरी ता.अध्यक्ष मधुसुधन पा.कदम यांनी केले.
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य नामफलकांचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गु. ह.भ. प.श्रीराम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, रामजी पाटील शिंदे, व्यंकटराव पाटील कपाटे, दत्तराम पाटील, एडके सल्लागार, शिवाजी पांगरेकर, बालाजी पा.जाधव, उपाध्यक्ष गंगाधर हंबर्डे, सचिव -व्यंकटराव जाधव सहसचिव प्रभाकर पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड संस्थेचे सदस्य प्रवीण रौतुलवाड, गुलाबराव पा.उबाळे, हरिनाम पा.कदम, संतोष पा.कदम, भगवान पा.रहाटीकर, त्रिमुख पा.येडके, प्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार असल्याची माहिती संयोजक मंडळी यांच्याकडून कळविण्यात आली आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील शाखेतील सर्व आघाडी, मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी,युवक आघाडी,साधुसंत,भाविक भक्त मंडळी उपस्थिती राहुन आपल्या जीवनात अमुलाग्र व संतांच्या सानिध्यात वावरण्यासाठी संत संग हाच खरा मार्ग आहे आणि जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्ती आणि जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचा आहे. म्हणून अशा महान प्रसंगी आपली उपस्थिती असणे ही गरज असुन संस्थापक अध्यक्ष ह भ प पुज्य गुरूवर्य श्री राम महाराज पांगरेकर यांच्या रसाळ ज्ञान अमृतांचे गोडवे घेण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील धार्मिक वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी गाव तिथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची नांदेड जिल्ह्यातील अनेक शाखा उदघाट्न व अनावरण सोहळा करण्यासाठी या संतसंग मेळाव्यात सर्व सदभक्तानी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे उमरी तालुका अध्यक्ष मधुसूदन पा. कदम, भगवान पाटील रहाटीकर, बालाजी निलेवाड, नामदेव पाटील, गोविंद धोंडिबा पाटील, बालाजी पाटील, उमरी तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री शिवराज होनशेट्टे, अशोक वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी उपप्रमुख व रहाटी येथील शाखा अध्यक्ष शिवशंकर पाटील, गोविंद पा, गणेश पा,भगवान कचराजी पा, गणेश पा, श्रीराम पा, राजेश पा, संतोष पा, पंडीत पा, संतोष महाराज, रामेश्वर पांचाळ, ज्ञानेश्वर पा, परमेश्र्वर पा, हणमंत पा, मधुकर पा, रहाटीकर व शाखा कार्यकारणी रहाटी यांनी केले आहे.असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.