सदगुरु सखाराममहाराज वाडी संस्थांनाच्या अद्यावत वेबसाईटचे नुतनीकरण

0
               अमळनेर (प्रतिनिधी) - २५० वर्षाहून अधिक इतिहास असणाऱ्या श्री सदगुरु सखाराममहाराज वाडी संस्थानाच्या वेबसाईटचे लोकार्पण व नुतनीकरण करण्यात आले. सोशल मिडीयाच्या युगात वावरतांना आपल्या संस्थानाचा इतिहास व संस्थांच्या सामाजिक कार्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेबसाईटचे नवीन अद्यावत वेबसाईटचे नुतनीकरण करण्यात आले असून यात संस्थेचा इतिहास, पायीवारीसह संस्थाचे विविध सामाजिक तसेच धार्मिक, शैक्षणिक उपक्रम भक्तगणांपर्यंत पोहचले पाहिजे यासाठी श्री सदगुरु सखाराममहाराज संस्थांनाचे गादीपती प. पू. प्रसादमहाराज गुरु ज्ञानेश्वरमहाराज यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने www.sakharammaharaj.org ही वेबसाईट अद्यावत करण्यात आली आहे.

           ऑनलाईन देणगी सुविधा तसेच अद्यावत ऑनलाईन माहिती प्रसारण व्हावी यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत असे संस्थानाचे जनसंपर्क प्रमुख उदय देशपांडे यांनी सांगितले. या प्रसंगी मंदिराचे मुख्यपुजारी सखाहरी देव, प्रमुख कार्यवाह रमेश जोशी, महेश दुसाने, भटू सोनार, संजय भांडारकर, लक्ष्मिकांत
सोनार हे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)