लोकप्रिय साईराजसोबत बालकलाकार मायरा वायकुळदेखील दिसणार
बीड (वृत्तसंस्था) - 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' गाण्यामुळे बीड जिह्यातील साईराज केंद्रे राज्याच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला. या गाण्यातील साईराजच्या निरागस हावभावाने सगळय़ांची मने जिंकून घेतली. या व्हिडीओला अवघ्या काही दिवसांत 4.23 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. साईराज सगळय़ांचा लाडका बनला आहे.
आता साईराजचे नवे गाणे लवकरच येणार आहे. गायक, संगीतकार प्रवीण कोळी यांच्या 'देवबाप्पा' या गाण्यामध्ये साईराजला काम करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये साईराजसोबत लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळदेखील दिसणार आहे. याची झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
यामध्ये साईराज आणि मायरा यांच्या हातात बालगणेशाची मूर्ती दिसत आहे. यानिमित्ताने नेटिजन्स दोघाही बालकलाकारांना भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना दिसत आहेत.