वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे जागतिक बांबू दिन साजरा

0
         अलिबाग  (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बांबू लागवड करावी. त्याच्यापासून अनेक शोभेच्या वस्तू, प्रक्रिया करून वाहनांसाठी इथेनॉल निर्मिती करता येते व अनेक ठिकाणी त्याचा जन्मापासून मृत्यूपर्यंत वापर होतो. आमच्या नर्सरी मध्ये बांबूची रोपे उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा. तसेच आमच्या खात्यातर्फे जून महिन्यात बांबू व शेवगा रोपे शेतकऱ्यांना देण्यात आली. सध्या पाऊस सुरू असल्याने अजूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना  हवी असल्यास आपल्या ग्रामपंचायत तर्फे आपण रोपांची मागणी केल्यास देण्यात येतील असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. अलिबाग तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना बांबू लागवड पासून ते उत्पादित साहित्य याची माहिती प्रमुख मार्गदर्शक सचिन भोईर, कृषी पर्यवेक्षक अलिबाग यांनी दिली. भारतीय कृषक समाज नवी दिल्लीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रगतिशील शेतकरी जयपाल पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, बांबूची लागवड आपल्या शेतात करताना आपली शेत जमीन त्यासाठी उपयुक्त आहे का नाही. यासाठी मातीची तपासणी आरसीएफ थळ मध्ये करून घ्यावी असा मोलाचा सल्ला दिला. तर शेतकऱ्यांना शेतावर जाताना व येताना अचानक पाऊस व वीजा चमकू लागल्या तर केंद्र सरकारने. विजा पासून धोका निर्माण होऊन. नुकसान होते यासाठी दामिनी ॲप निर्माण केला असून, त्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलवर घ्यावा. बांबू लागवडी बाबत उपयुक्त सूचना व माहिती माजी ग्रामसेवक ओंकार महाले यांनी दिली. त्यांच्यासोबत रायगड जिल्हा बुरुड समाजाचे जिल्हाध्यक्ष. रुपेश जामकर यांनीही आपल्या शंकेचे निरसन करून घेतलं. मानीभुते येथील शेतकरी पोलीस पाटील म्हात्रे यांनी. लागवडी बाबत अनेक अडचणी सांगितल्या. त्याची समर्पक उत्तरे सचिन भोईर यांनी दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप बैनाडे व वानखेडे कृषी अधिकारी अलिबाग, ज्येष्ठ समाजसेवक सलीम तांडेल, कैकाडी समाजाचे अध्यक्षशंकर हनुमान जाधव उपस्थित होते. यावेळी बांबू पासून होणारे विविध प्रकारचे वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.डी. तायडे वन अधिकारी चौल यांनी केले. या कार्यक्रमास अलिबाग तालुक्यातील सर्व वनपाल, वनरक्षक, शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)