अलिबाग (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी संचालक पदी नियुक्तीचे पत्र कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे व महासंचालक डॉक्टर मंगेश देशमुख यांनी. दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी पाठविले आहे.
प्रा. जयपाल पाटील आंबा, नारळ, भाजीपाला उत्पादक असून ते अधिक उत्पादनाचे प्रयोग सातत्याने करतात. त्यांची १६ व्या जागतिक कृषी प्रदर्शन ईसरायला अभ्यास दौऱ्यास महाराष्ट्र शासनाने सन २००६ रोजी निवड केली होती. त्यानंतर पाणी वाचवा, व शेतकऱ्यांची सुरक्षा याविषयी महाराष्ट्रात शेती विषयक होणाऱ्या मेळाव्यात प्रबोधन करतात. मुंबई आकाशवाणी कृषी कार्यक्रम समिती सल्लागार म्हणून काम पाहतात. नुकताच रायगड जिल्हा कृषी विभागाने पनवेल येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. रायगडातील १ हजार शेतकऱ्यांना त्यावेळी आपत्ती व सुरक्षा वरील मार्गदर्शन केले होते ते फेसबुक युट्युब वर प्रक्षेपण केले होते.त्यांनी आकाशवाणी मुंबईवरून शेतकऱ्यांची सुरक्षा आकाशवाणी रत्नागिरी वरून युवक युवतींची सुरक्षा, आकाशवाणी सोलापूर वरून कामगांराची सुरक्षा, आकाशवाणी कोल्हापूर वरून ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि पुणे आकाशवाणी वरून महिलांची सुरक्षा वर व्याख्याने दिली आहेत. शासकीय ज्येष्ठ पत्रकार असल्याने पत्रकार केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती प्रिंट व सोशल मीडिया वरून कायम देत असतात. रायगड जिल्हा परिषदेने 1जुलै 2017 ला कृषीनिष्ठ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले तरआपत्ती व्यवस्थापन कार्याबाबत 9 मार्च 2019 ला रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. या कार्याची दखल घेऊन लोक कल्याणासाठी त्यांचा देशभरात राज्यात, आपत्ती व्यवस्थापनामुळे संपर्क लाखो लोकांपर्यंत असल्याने त्यांचा अनुभव, कौशल्य देशभरात, राज्य व जिल्ह्यात विद्यापीठाचे विविध उपक्रम, गतिमान करण्यासाठी पीपल वर्चुअल छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाने प्राध्यापक जयपाल पाटील यांची संचालक विस्तार पदी निवड करण्यात आली आहे. सध्या ते रायगड जिल्ह्यातील 804 ग्रामपंचायत मधे शेतकरी नागरिकांना रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने आपत्ती सुरक्षाचे धडे देत आहेत. त्याचाही लाभ लोक विद्यापीठाला होईल असे महासंचालक डॉक्टर मंगेश देशमुख यांनी सांगितले आहे.