सैन्यभरती..... कर्जत येथे मार्गदर्शन मेळावा

0
मोफत मार्गदर्शन मेळावा

       अलिबाग (प्रतिनिधी) = रायगडचा युवक फाउंडेशनच्या युवक अकॅडमी तर्फे भारतीय सैन्य भूदल, हवाई दल, नेव्ही व केंद्र सरकारच्या गृहखात्याची सुरक्षा दलात रायगड जिल्हा सैनिक कार्यालयाच्या सहयोगाने मोफत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 5 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे.
           यासाठी भारतीय सैन्यात १०वी पास मुली व तिन्ही दलात १०वी, १२वी, पदवीधर,परिचारीका मुले, मुली, आय.टी.आय. डिप्लोमा, इंजिनीयरआणि बँड पथकातील साहित्य वाजविणारे, शिपाई, सफाई कामगार, 8वी पास, एस.एस.सी नापास, हिंदू ,मुस्लिम, पारशी धर्माचे शिक्षण देणारे  मुले यांना माहितीचे शिबिर मंगळवार 5 सप्टेंबर सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महालक्ष्मी गेस्ट हाऊस मोठे वेणगाव येथे आपल्या प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.
       या शिबिरात भरती योग्य, भरती इच्छुक मुले मुली. उमेदवारांसाठी ५ दिवसाचे निवासी शिबिर परीक्षा महालक्ष्मी गेस्ट हाऊस मोठे वेणगाव येथे होणार आहे.5 सप्टेंबर च्या मेळाव्यासाठी आपली नोंदणी फाउंडेशनचे आपत्ती सुरक्षा मित्र, निवृत्ती ढाकवळ मो.७०६६८७०२९७, एँड संतोष जोहेकर मो.९८२२५१२७३६, एँड पंकज तारे मो.७०३०१९६५५५, मारुती बागडे गुरुजी मो.९२०९५०३८१५, एम.पी.पाटीलसर मो.९०११२९२९८२ येथे नोंदणी करावी.
          अधिक माहीतीसाठी मो. 9270446777  येथे संपर्क साधावा असे आवाहन रायगडचा युवक फाउंडेशनचे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, रायगड भूषण जयपाल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात दिले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)