संगमनेर (विषेश प्रतिनिधी) - संपादक व पत्रकार सेवा संघ मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संपादक राज्य परिषद 2023 चे उदघाटन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेबथोरात यांच्या हस्ते सह्याद्री महाविद्यालय येथे संपन्न झाले.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यभरातून आलेले संपादक व पत्रकार यांचे लोकप्रतिनिधी या नात्याने संगमनेर शहरात स्वागत करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे, मा.नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाचे प्रमुख डाॅ. वि.ल. धारूरकर, परिषदेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे, उपाध्यक्ष नरेंद्र लचके, समन्वयक मनोज आगे, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील , जि.प.सदस्य सिताराम राऊत, नामदेव गुंजाळ यांच्यासह राज्यभरातील संपादक व पत्रकार उपस्थित होते. महाराष्ट्रातील संपादकांच्या अडचणी बाबत विधान परिषदेमध्ये मी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन आमदार सत्यजित तांबे यांनी दिले. त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपदी ऊरणचे संपादक अजित पाटील यांना आमदार सत्यजित तांबे यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी डाॅ. वि.ल. धारूरकर यांचे पत्रकार संपादकांना उत्कृष्ट मार्गदर्शन झाले. रायगड भूषण जयपाल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले.
समारोपात किसन भाऊ असे म्हणाले की आपण सर्वजण बहुमूल्य वेळ देऊन आपल्या व्यक्तिगत व सामूहिक प्रगतीसाठी एकत्र आलो असल्याने पुढील काळात संस्थेची संलग्न राहून शासकीय प्रश्न सोडविण्यासाठी व सामूहिक उपक्रमासाठी कृतिशील असावे कोविड नंतर प्रथमच संस्थेने ही परिषद घेतली असून यामध्ये नोंदणीकृत व निमंत्रित संपादकांना प्रवेश ठेवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून २०० संपादक उपस्थितहोते. समारोपाला प्रत्येक संपादकाला सॅक भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिसुंदरअसे संदीप हासे यांनी केले. सर्वांची निवासाची व्यवस्था शिर्डी संस्थांच्या 1000 एअर कंडिशन होस्टेलला करण्यात आली होती.तेथून संगमनेरला नेण्या-आणण्याची व्यवस्था दैनिक युवा वार्ताच्या सर्व सदस्यांनी केली होती.