सावरकरांचे जीवन तेजोमय - आ.समाधान आवताडे

0


   *मंगळवेढ्यात निघाली भव्य सावरकर गौरव यात्रा*


 मंगळवेढा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ मंगळवेढा शहरातून आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य गौरव यात्रा संपन्न झाली. आम्ही सावरकर म्हणत भगव्या टोप्या घालून सावरकरांचा जयघोष करत , भारत माता की जय , वंदे मातरम घोषणा देत गौरव यात्रा निघाली. श्री संत दामाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून गौरव यात्रा सुरू करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ भव्य अशा गौरव यात्रा निघत आहेत , याच पार्श्वभूमीवरती मंगळवेढा शहरांमधून देखील गौरव यात्रा काढण्यात आली . या या गौरव यात्रेदरम्यान बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले ," स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन तेजोमय व धगधगते असून त्यांच्यावरती आरोप करणे किंवा त्यांच्याबद्दल मनामध्ये आदर नसणे हे कोणत्याही भारतीय नागरिकाला शोभणार नाही . सावरकरांनी देशाला स्वतंत्र मिळण्याकरता लहानपणापासूनच शपथ घेऊन आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. आपलं शैक्षणिक जीवन जगत असताना त्यांनी देशाच्या बाहेर राहून देखील देशाची सेवा केली व या देशाला स्वातंत्र्य करण्याकरता तरुणांची फळी निर्माण करण्याचं काम केलं. इंग्रज सरकार त्यांना एवढं भीत होतं की त्यांनी सावरकरांना पन्नास वर्षाहून अधिक काळ्यापाण्याची शिक्षा केली पण आजकाल जे काही काँग्रेसचे लोक सावरकरांबद्दल गरळ ओकण्याचे काम करत आहेत त्यांनी इतिहास जाणून घेतला पाहिजे . महात्मा गांधी देखील सावरकरांच्या त्यागाबद्दल जाणून होते , सावरकरांचे जीवन एक आदर्श असं जीवन आहे . सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारावा म्हणून सुभाष चंद्र बोस यांना देखील मदत केली . देशाकरता जीवनभर झटणाऱ्या सावरकरांना मी अभिवादन करतो. " अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी यावेळी व्यक्त केले. 




यावेळी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी देखील आपल्या मनोगत मधून सावरकरांचा गौरव करत हिंदी मधून त्यांना अभिवादन केले. माजी पालकमंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत जे मूळ भारत देशामधीलच नाहीत त्यांना इथल्या देश वासियांबद्दल व हा देश स्वतंत्र करणाऱ्यांबद्दल कशा पद्धतीने अभिमान असेल ? अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी हे फक्त नावाला गांधी असून त्यांचा मूळ इतिहास हा वेगळाच आहे . इटली मधून येऊन भारतीयां बद्दल बोलणं हे त्यांच्या रक्तात असून त्यांना इथल्या क्रांतिकारकांची किंमत काय कळणार ! महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर हे कळायचे असतील तर त्याला भारताच्या मातीमध्ये जन्म घ्यावा लागतो . अशा पद्धतीचे वक्तव्य यावेळी त्यांनी केले. 
 त्यासोबतच या गौरव यात्रेमध्ये भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण शशिकांत चव्हाण यांनी बोलताना राहुल गांधी यांच्यावरती टीका करत राहुल गांधी हे कर्माने देखील पप्पू आणि ज्ञानाने देखील पप्पूच आहेत , काँग्रेस फक्त नेहरू व गांधी यांनाच स्वातंत्र्याकरता लढलेले दाखवत आले आहेत , पण सावरकर असतील व अनेक असे क्रांतिकारी असतील त्यांना लपवण्याचं काम काँग्रेसने केले आहे. कितीही लपवला तरी सत्य लपत नसतं आणि कोणी कितीही टीका केली तरीही कोणाचं कर्तुत्व झाकता येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान होते व ते महानच राहतील . अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी यावेळी व्यक्त केले . 
या गौरव यात्रेमध्ये भाजप ज्येष्ठ ज्येष्ठ नेते दत्तात्रय जमदाडे तसेच राजकीय विश्लेषक दिगंबर यादव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .सदरील गौरव यात्रा श्री संत दामाजी चौक येथून सुरू होऊन शिवप्रेमी चौक चौखामेळा चौक मुरलीधर चौक या मार्गाने येऊन मुरलीधर चौक येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला.

या यात्रेसाठी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, प्रदीप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी संचालक राजेंद्र सुरवसे, सुनील रत्नपारखी, विश्वास चव्हाण, चंद्रकांत जाधव उमेश विभुते, संतोष मोगले नागेश डोंगरे सत्यजित सुरवसे, योगेश फुगारे, महादेव जाधव,संजय माळी, जनार्दन डोरले, शहाजी गायकवाड,धनाजी गडदे, संदीप करे, आप्पा स्वामी, सतीश मोहिते आनंदराव जावळे, युवराज कोळी, रामचंद्र कापशीकर, विवेक खिलारे, दीपक माने, सुधाकर मासाळ, खंडू खंदारे नंदकुमार जाधव, चंद्रकांत गोडसे विलास आवताडे, अशोक माळी, सुधीर करंदीकर, सुहास जोशी, विजय बुरकुल, सुहास पवार, दादासाहेब बेदरे, बाबा कोंडूभैरी, राजू भोसले, डी.सी जाधव, उमेश आवताडे, युवराज कोळी, बापूसाहेब मेटकरी, सुदर्शन यादव,नाथाजी काशीद, संजय भुसे, आनंद मुढे, आदित्य हिंदुस्थानी, सुशांत हजारे, अजित लेंडवे, सचिन हेंबाडे, आदी मान्यवर, सावरकर प्रेमी, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)