पंढरपूर (प्रतिनिधी) - वारकरी संप्रदाराचे मुखपत्र असलेले पंढरी संदेश हे साप्ताहिक गेली 52 वर्षे वारकरी संप्रदायाची सेवा निरपेक्ष वृत्तीने करीत आहे. बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबर चालण्यासाठी काळानुरुप बदलणे आवश्यक असते. त्यानुसारच आज श्रीहनुमान जन्मोत्सवाच्या शुभदिनी आम्ही ‘पंढरी संदेश न्युज’चा शुभारंभ करीत आहोत.
पंढरी संदेश न्युजचा शुभारंभ वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, ज्येष्ठ साहित्यिक, आमचे मार्गदर्शक ह. भ. प. पां. ग. तथा बाळशास्त्री हरिदास यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना श्री. बाळशास्त्री हरिदास म्हणाले- बिडकर घराण्याने पत्रकारीतेचा वारसा गेल्या अनेक पिढ्यांपासून जोपासला आहे. तोच वारसा आता श्री. रामकृष्ण ग. बिडकर मोठ्या सचोटीने चालवित आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर ऑनलाईन न्युजचा शुभारंभ करुन सर्वसामांन्य जनतेच्या अडीअडचणी, समस्यांना वाचा फोडावी तसेच देव-देश-धर्म सेवेसाठी कार्यरत रहावे असेही ते म्हणाले. ‘सत्य संकल्पाचा दाता नारायण’ या उक्तीप्रमाणें आपल्या न्युज चॅनलची उत्तरोत्तर भरभराट होवो अशी श्रीरुक्मिणी पांडुरंग चरणी प्रार्थना केली.
याप्रसंगी श्री. अनिलमहाराज हरिदास यांनी न्युज पोर्टलचे माध्यमातून प्रसारित केल्या जाणार्या पेजची माहिती घेतली. व पंढरी संदेश न्युजला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
अभिनंदन
ReplyDeleteअभिनंदन व शुभेच्छा 💐💐
ReplyDeleteCongratulations and All the best!!!
ReplyDelete