आमदार समाधान आवताडे यांनी बोलावली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक

0
मंगळवेढा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा विभाग येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सार्वजनिक बांधकाम विश्राम मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांनी संयुक्त बैठक बोलवली आहे. पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यानंतर लवकर न करणे, वेळेत न बसविणे शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणे शेतकऱ्यांच्या अशा विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आमदार आवताडे यांनी ही बैठक बोलावली आहे.

सदर बैठकीच्या अनुषंगाने मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांच्या विजेसंदर्भात अडीअडचणी अथवा समस्या असतील अशा शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व अडीअडचणी लेखी स्वरूपात गुरुवार सायंकाळपर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा व पंढरपूर येथे जमा करावेत.



या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर मंडळ कार्यालय सोलापूरचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उपअभियंता तसेच संबंधित विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर इत्यादी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी आमदार कार्यालयाकडून पत्राद्वारे आदेशित करण्यात आले आहे. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वीजेसंबंधी असणाऱ्या विविध प्रश्नांचा आमदार आवताडे आढावा घेणार घेऊन आवश्यक कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत.






Post a Comment

0Comments
Post a Comment (0)