राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने 1 एप्रिल हा " एप्रिल फुलचा दिवस "मोदीचा विकासाचा वाढदिवस' म्हणून साजरा

0


पंढरपूर- 1 एप्रिल हा मजेशीर जोक व कॉमेंटचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यादिवशी कधीही शक्य न होणाऱ्या गोष्टींवर विनोद करण्याची परंपरा आहे. या बाबतीत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत जोक करत असतात. त्यातच आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने 1 एप्रिल हा " एप्रिल फुलचा दिवस "मोदीचा विकासाचा वाढदिवस' म्हणून पंढरपूर शहरात साजरा करण्यात आला. 

भाजपाला मत दिले की बाहेर देशातील काळा पैसा भारतात आणून सर्वांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करू असे आश्वासन मोदी साहेबांनी दिले होते ते आजपर्यंत पुर्ण झालेले नाही. नंतर त्यांनी निवडणूक झाली की हा निवडणूक जुमला होता असे सांगितले म्हणून आज त्याची आठवण सर्वसामान्य नागरिकांना करून देण्यासाठी 1 एप्रिल दिवशी जुमला सहकारी बॅंक यांच्या फसव्या आश्वासनाला बळी पडलेल्या लाभार्थी यांना 15 लाख रूपये अकडा लिहिलेला प्रतिकात्मक चेक वाटप करून आंदोलन करण्यात आले. सदरचे आंदोलन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी कमल का फुल एप्रिल फुल, मोदी डे अशा घोषणा देण्यात आल्या.





यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, उपाध्यक्ष विशाल सावंत,शुभम पवार ,उद्योग व्यापार सेलचे अध्यक्ष उमेश सासवडकर, कपिल जगताप, सारंग महामुनी, निलेश कोरके, मा नगरसेवक मोहम्मद उस्ताद, युवक कॉंगस आय चे शहराध्यक्ष संदीप शिंदे, समीर कोळी,संग्राम जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना कधीही पुर्ण न होणारे आश्वासन देवून भाजप सत्तेत आलेला आहे महागाई कमी करण्याचा विषय सोडूनच द्या वरचेवर महागाई वाढतच आहे त्यामुळे सर्वसामान्यांना त्याची आठवण करून फसव्या आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या भाजपच्या योजना कशा चुकीच्या व भुलथापा देणाऱ्या आहेत हे दाखवून देण्यासाठी आजचे 1 एप्रिलचे एप्रिल फुलचे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)